जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व

शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी जेवणात पौष्टिक तत्वांचा योग्य समावेश असणे आवश्यक आहे. हेकोणत तत्व आहेत व यांना काय फायदा आपल्याला होऊ शकतो, समजुया.

प्रोटीन :
शरीरिक विकास, उत्साह, आणि शक्ति या सर्वांसाठी प्रोटिन आवश्यक आहे. हे प्रोटीन्स आपल्याला सर्व धान्य, मटार, कडधान्य, दूध, ताक, पनीर व इतर दुधापासून तयार केलेले पदार्थ, फळे यांच्यातून मिळते.

वसा :
शरीरात शक्ती आणि उर्जेसाठी वसा घेणे आवश्यक आहे. दूध, दही, घी, क्रिम, लोणी, तेल, काजू, बादाम, शेंगदाणे इत्यादी जास्त प्रमाणात वसा असतो.

खनिज :
खनिज शरीरात शक्ति कायम ठेवण्याचे काम करतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी व शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी खनिजांचा जेवणात समावेश अत्यावशयक आहे.

कार्बोहाइड्रेट :
शक्ति, उर्जा व शारीरिक विकासासाठी कार्बोहाइड्रेड आवश्यक आहेत. गहूम मक्का, ज्वारी, बाजरी, ऊस, मोड फळे इत्यादीत.

पाणी :
शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. शरीराची अंतर्गत स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी मददगार ठरते. योग्य प्रमाणात पाणी प्यायलाने अन्नाचे चांगले पचन होण्यास मदत होते व शरीराचे तापमान योग्य राहते.

कॅल्शियम :
हाडे, दात व केसांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. याने मासिक पाळी संबंधी त्रास नियंत्रित होतात. हिरव्या भाज्या, दूध, दही, ताक, पनीर इत्यादी मध्ये कॅल्शियम भरपूर असते.

लोह तत्त्व :
लोह तत्त्वांच्या कमतरतेने शरीरात रक्ताची कमी होते. याच्या अभावाने हृदय व शरीराच्या प्रत्येक भागात शुद्ध रक्त पोहचवण्यात असमर्थ होते.हे हिरव्या भाज्या, धान्य, फळे इत्यादीमध्ये सापडते.

विटामिन :
शरीर स्वस्थ व रोगमुक्त ठेवण्यासाठी विटामिन गरजेचे आहे. हिरव्या भाज्या, ताजी फळे, गहू, दुधापासून तयार केलेले पदर्थ लोणी, मोड आलेली कडधान्ये, घेवडा इत्यादी राज्यात मध्ये विटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात.