पाकातले बेसनाचे लाडू

साहित्य :

  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • १ वाटी साखर
  • ३-४ वेलदोड्यांची पूड
  • १ टे. चमचा खडीसाखरेची जाडसर पूड
  • १ वाटी तूप.

कृती :

नेहमीप्रमाणे तुपावर डाळीचे पीठ भाजून घ्या. छान वास आला की त्यावर थोडेसे गरम दूध शिंपडा.साखरेत अर्धी पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात भाजलेले बेसन घालावे. ढवळावे वेलदोड्याची व खडीसाखरेची पूड घालावी व मिश्रण घट्ट झाले की लाडू वळावे.