पाकातल्या पुर्‍या

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा
  • १ वाटी बारीक रवा
  • अर्धी वाटी तेल
  • अर्धा चमचा मीठ
  • १ वाटी आंबट ताक
  • २ वाट्या साखर
  • २ लिंबाचा रस
  • थोडेसे केशर व केशरी रंग
  • तळण्यासाठी तूप.

कृती :

रवा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व मीठ घालून कालवा. नंतर १ वाटी ताक घालून पीठ भिजवा. जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी वापरा. पुऱ्यासाठी पीठ भिजवतो तसे घट्ट पीठ भिजवा.साखरेचा एकतारी पाक करा. त्याट लिंबाचा रस, केशार व केशरी रंग घाला. वरील पिठाच्या जरा लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात. तुपात तळव्या व लगेचच पाकात ताकाव्या. पाक गरम असावा.दुसरा घाणा झाला झाला की पहिल्या पुऱ्या पाकातून काढून ताटात ठेवाव्या. पाक फार घट्ट झाल्यासारखे वाटल्यास त्यात थोडे थोडे पाणी घालून उकळून घ्यावा.