पालक पुर्‍या

साहित्य :

 • एक जुडी पालक
 • १ ते १॥ वाटी ओले खोबरे
 • ३ मोठे चमचे डाळीचे पीठ
 • ८-१० हिरव्या मिरच्या
 • २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर
 • अर्धा चमचा हिंगची पूड
 • दोन चमचे तेल (फोडणीसाठी)
 • एक मोठा चमचा लिंबाचा रस
 • चवीनुसार मीठ
 • तळणीसाठी तेल
 • २॥ वाट्या कणिक
 • १॥ चमचा मीठ

कृती :

पालक पुर्‍या

पालक पुर्‍या

कणकेत मीठ घालून पाण्यानी घट्ट भिजवावी व तासभर झाकून पालकाचे पाणी खुडून धुवावी व बारीक चिरावी. हिरव्या मिरच्या चमच्या भर मीठ एकत्र वाटावे त्यात कोथिंबीर, ओले खोबरे व लिंबू रस घालावा व हाताने मिसळून कालावावे.

पातेल्यात तेल तापले की त्यावर मोहरी घालावी. तडतडली की हिंग घालावा. त्यावर पालक घालून ५ मिनिटे परतावा. पालक शिजला की, नारळाचे मिश्रण व डाळीचे पीठ घालावे. तीन चार मिनिटे ढवळावे व खाली उतरवावे. कोमट झाले की मिश्रणाचे लिंबाएवढे लहान गोळे वळावे.

तेलाच्या हाताने कणिक जरा मळून घ्यावे. फुलक्या घेतो तेवढी कणकेची गोळी घेऊन त्याची जाडसर पुरी लाटावी त्यावर पालकाची एक गोळी ठेवावी. कडा एकत्र जुळवून पुन्हा गोल कचोरी सारखी वळावी. पोलपाटावर किंवा ताटात थोडे पीठ भुरभुरावे. त्यात पीठावर बोटाने भाकरी थापत तशी जरा जाडसर पुरी थापावी. व कढईत बदामी रंगावर येईपर्यंत तळावे.

या पुर्‍या गरमगरम तळून संध्याकाळच्या चहाबरोबर चांगल्या लागतात.