पांढरा चिवडा

साहित्य :

 • पाव किलो पातळ पोहे
 • १ वाटी मुगाची डाळ
 • १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
 • अर्धी वाटी भाजून सोललेले शेंगदाणे
 • ७-८ लाल मिरच्या
 • १ टे. चमचा पांढरे तीळ
 • थोडासा कडिलिंब
 • मीठ
 • तेल
 • फोडणीसाठी तुप
 • हिंग
 • जिरे.

कृती :

मुगाची डाळ ३ ते ४ तास भिजवावी. भिजत घालताना त्यात वालाएवढी तुरटी घाला.नंतर डाळ उपसून कपड्यावर जरा कोरडी करा व तेलात मोठे गाळणे ठेवून त्यातून तळा. वाटल्यास आदल्या दिवशी डाळ तळावी व दुसऱ्या दिवशी चिवडा फोडणीस टाकावा.पातळ पोहे परतून घ्या. कुरकुरीत झाले की कागदावर ओतून टाका. खोबऱ्याचा कीस जरा परतूनघ्या.डालडा तुपाची हिंग, जिरे घालून फोडणी करा. त्यात लाल मिरच्याचे तुकडे व कडिलिंब घाला. जरा परतूनत्यात तीळ व शेंगदाणे घाल. नंतर खाली उतरवून ठेवा. त्यात भाजलेले पोहे,मीठ व सुक्या खोबऱ्याचा कीस घाला. मिश्रण चांगले ढवळा. जरा वेळ गॅसवर परता. नंतर त्यात तळलेली डाळ घाला व उतरवा.