पंडित सी.आर.व्यास

पंडित सी.आर.व्यास यांच्याबद्दल माहिती :

पंडित सी.आर.व्यास

पंडित सी.आर.व्यास

पंडीत चिंतामणी रघुनाथ व्यास यांचा जन्म १९२४ साली संस्कृत पंडितांच्या घरी झाला.

सुरूवतीला सुमारे दशकभर त्यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले.

आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले.

अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्यात १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कारांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

1 thought on “पंडित सी.आर.व्यास

  1. Pingback: चिंतामणी जयंती समारोह २०१२ | Chintamani Jayanti Samaroh 2012

Comments are closed.