पनीर पुलाव

साहित्य:

  • २ वाटी तांदूळ
  • २५० ग्रॅम पनीर
  • १ वाटी मटार सोललेले
  • २ टॉमेटो
  • २ हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीप्रमाणे
  • १/२ लहान चमचा गरम मसाला
  • २ तुकडे दालचिनी
  • २ मोठे चमचे तूप

कृती:

पनीर पुलाव

पनीर पुलाव

तांदूळ धूऊन १५ मिनीटे भिजवा. पनीर चौकोनी चिरुन घ्या. टॉमेटो मिक्सरमधून काढा. हिरवी मिरची बारीक चिरा. दालचिनी बारीक वाटून घ्या. एका कढईत तूप गरम करून दालचिनी गरम मसाला टाका. याच्यात टॉमेटो पेस्ट व चिरलेली हिरवी मिरची टाकूण परता. टॉमेटो चांगला परतल्यावर पनीर, मटार, तांदूळ व ४ कप पाणी टाका. गॅस कमी करून झाकून शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा व दह्याबरोबर वाढा.