पारवा आणि तसबीर

एका आरशांत एक तलावाचे चित्र बसविले होते, ते पाहून त्यांतले पाणी पिण्यासाठी एका पारव्याने त्या आरशावर उडी मरली. त्यामुळे, आरशाच्या कडांवर आपटून त्याचे पंख आणि चोंच ही अगदी मोडून गेली आणि तो खाली पडला. जवळच कांही पोरे खेळत होती त्यांनी त्यास पकडून खेळावयास नेले !

तात्पर्य:- अविचाराने एकाएकी भलत्याच कामास हात घालणे चांगले नाही.