परभणी जिल्हा

धार्मिक जनांची अनेक श्रद्धास्थाने जपणारा, धार्मिक मनाला वंदनीय असलेला हा जिल्हा ! हा नामदेवांचा जिल्हा. नामदेवांचा जन्म येथीलच नरसीबामणीचा ! नामयाची दासी जनाबाई, तिचा हा जिल्हा. ती गंगाखेडची ! येतेह जनाबाईची समाधीही आहे.

नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांच्य वास्तव्यानेही ही भूमी पावन झाली आहे. औंढ्या नागनाथ येथे गुरू-शिष्यांच्या समाधी आहेत.
महानुभाव पंथातील एक संतकवी भास्करभट्टही याच जिल्ह्यातील कासारबोरीचे.

औंढ्या नागनाथ, मुदगळ, शिरडशहापूर, जिंतूर (जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान) यांसारखी क्षेत्रे या जिल्ह्यात आहेत.