पातळ पोह्य़ाचे सांडगे

साहित्य:

  • पातळ पोहे
  • तिखट
  • मीठ
  • लसूण
  • कुटलेले जिरे
  • तीळ
  • कोथिंबीर
  • थोडेसे ताक

कृती:

पातळ पोहे १५ मिनिटे आधी धुऊन ठेवावेत. नंतर त्यात तिखट, मीठ, तीळ, कोथिंबीर, लसूण व कुटलेल जिरे, थोडेसे ताक घालून एकत्र मिसळावे व त्याचे सांडगे घालावेत. दोन दिवस उन्हात सुकल्यावर तळावेत.