पातळ पोह्य़ांच्या चकल्या

साहित्य:

  • पातळ पोहे अर्धा किलो
  • जिरे एक टी स्पून
  • धने एक टी स्पून
  • काळीमिरी अर्धा टी स्पून
  • तिखट-मीठ आवडीनुसार

कृती:

पोहे निवडून घ्या. जिरे-धणे आणि मिऱ्याची जाडसर पूड करा. पातळ पोह्य़ांवर पाण्याचा हबका मारा. सगळे मसाले मिसळा आणि ज्याप्रमाणे आपण कणीक मळतो त्याप्रमाणे मळून चकल्या पाडा. गरम उन्हात कडकडीत वाळवा. या चकल्या खुसखुशीत लागतात.qटीप : आपण यात पाण्याऐवजी ताकही वापरू शकतो.