पातोड्याची आमटी

साहित्य :

  • १ वाटी डाळीचे पीठ
  • जिरे पावडर
  • हळद
  • हिंग
  • मोहरी
  • तिखट
  • मीठ
  • ५-६ लसूण पाकळ्या
  • पाव वाटी तेल
  • ४ वाट्या पाणी

कृती :

१ वाटी डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर चवीपुरते घालावे. १ चमचा तेल घालावे. नंतर सर्व एकत्र करून पाणी घालून घट्ट भिजवावे. पातेल्यात ४ वाट्या पाणी घेऊन त्या पाण्यात साधारण १ मोठा चमचा डाळीचे पीठ टाकावे व ते पाण्यात एकजीव करावे. त्यात तिखट, मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर घालावी व पातेले गॅसवर ठेवावे. भिजवलेल्या पिठाचे दोन गोळे करावेत. एका गोळ्याची पोळी लाटून त्याचे शंकरपाळ्यासारखे भाग पाडावे. नंतर दुसरी पोळी लाटून त्याचेही वरीलप्रमाणे भाग करावे. पातेल्यतील पाणी उकळू लागल्यावर सर्व तुकडे त्यात टाकावेत व ते मंद गॅसवर १० मिनिटे उकळू द्यावेत. नंतर पातेले खाली उतरवावे व त्यावर लसणाचे बारीक, तुकडे करून तेलावर गुलाबी रंगाचे झाल्यावर खमंग फोडणी घालावी.