पातोळे

साहित्य:

  • २ वाट्या काकडीचा कीस
  • ६ वाट्या तांदळाचे पीठ
  • दीड वाटी ओले खोबरे
  • अडीच वाट्या बारीक चिरलेला गूळ
  • १ चमचा मीठ.

कृती:

जून काकडी किसून घ्यावी. नंतर पिळून घ्यावी व कीस मोजावा.नंतर सर्व एकत्र करुन गेसवर ठेवावे व जरा शिजवून घ्यावे. नंतर हळ्दीच्या अर्ध्या पानावर लिंबाएवढा गोळा थापावा. अर्धे पान दुमडून घ्यावे. अशी थोडीशी पाने तयार करुन घ्यावी.मोदकपात्रात पाणी घालून उकळण्यास ठेवावे. त्यावरील चाळणीवर एखादे उभट भांडे ठेवावे. त्याच्या बाजूने ही तयार केलेली पाने नीट लावावी व १० मिनिटे वाफवून घ्यावी. तोपर्यंत दुसरी पाने तयार करावी.वाफवलेली पाने सोडवून घ्यावी व हे पातोळे साजुक तुपाबरोबर खायला घ्यावे. कोकणात दसऱ्याच्या दिवशी पातोळे करण्याची पद्धत आहे.