पिकलेला आंबा सरबत

साहित्य :

  • ६ आंबे
  • १ लि.पाणी
  • १ लिंबाचा रस
  • १ कि.६०० ग्रॅम साखर
  • अर्धा चमचा सोडियम बेन्झॉइट
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड

कृती :

प्रथम आंबे पिळून घेऊन त्यांचा रस काढावा. तो रस मोजून गोडी पाहून त्याप्रमाणे साखर + पाणी + सायट्रिक अ‍ॅसिड एकत्र करून गॅसवर ढवळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. सोडियम बेन्झॉइट मिसळताना प्रथम अर्धा कप मिश्रणाच्या पाण्यात टाकून ते विरघळून मग सर्व मिश्रणात ते पाणी
घालावे. याप्रमाणे सोडियम बेन्झॉइट मिसळून घ्यावे. पाक थंड झाल्यावर त्यात आंब्याचा रस एकत्र करावा.सरबत देताना पाव भाग पाकातला रस व पाऊण भाग पाणी घालून सर्व्ह करणे.