पायनॅपल लस्सी

साहित्य :

  • ४ ग्लास गोड ताक
  • १०० ग्रॅम साखर
  • अर्धा अननस
  • वेलची पूड
  • चवीपुरते मीठ

कृती :

अननसाचा रस काढावा. मिक्सरमध्ये ताक, साखर, किंचित मीठ घालून घुसळून घ्यावे.अननसाचा वेगळा काढलेला रसही त्यात घालावा व हे मिश्रण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा घुसळून घ्यावे व त्याचे ग्लास भरून त्यात वेलदोडा पूड व बर्फ टाकूण सर्व्ह करावे.