पाईनअ‍ॅपल पॅशन

साहित्य :

  • १ लिटर पॅक व्हॅनिला आईस्क्रीम
  • २ वाट्या डब्यातल्या अननसाचे तुकडे
  • अर्धी वाटी अक्रोडचा जाड चुरा
  • १०-१२ चेरी
  • अर्धी वाटी घोटलेली साय किंवा क्रीम (ऐच्छिक)

कृती :

पाईनअ‍ॅपल पॅशन

पाईनअ‍ॅपल पॅशन

काचेच्या छोट्या पुडिंग बोल्समध्ये तळाला अननसाचे ५-६ लहान तुकडे घालावे.

त्यावर चमचाभर साय, चमचाभर अक्रोडचुरा घालून एक आईस्क्रीमचा स्कूप घालावा.

स्कूप चमचा नसल्यास डावभर आईस्क्रीम घालावे.

चेरीचे तुकडे व चॉकलेट क्रीम शोभेसाठी भुरभुरावा.