प्लॅस्टिक सर्जरी

प्लॅस्टिक सर्जरी(plastic surgery) म्हणजे स्त्रियांसाठी नवे वरदानच
प्राचीन काळातील स्त्री आणि विसाव्या शतकातील स्त्री तारुण्यात पदार्पण करताच एकच गुलाबी स्वप्न जतन करत होती, करते आहे. दोघींच्या स्वप्नाचे चेहेरे बदलले आहेत. पण एकूण आकृती तीच आहे. पूर्वीच्या उपवर राजकन्येच स्वप्न होत दारात एक शुभ्र घोडा आणि त्यावर स्वार झालेला उमदा राजपुत्र ! तरुणांचेही तेच.

प्लॅस्टिक सर्जरी

सध्याच्या या आधुनिक कालातही ‘मुलगी सुंदरच हवी’ हा सर्वच तरूनांचा हट्ट असतो. त्यामुळं सुंदर मुलींनी ‘योग्य’ वर हेरल्यानंतर उरलेल्या सर्वसाधारन मुलींचे विवाह ही सर्वच कुटुंबियांना भेडसावणारी काळजी ठरते. अविवाहित मुली ह्या समाजाच्या अवहेलनेचे एक साधन बनतात. केवळ रूपामुळं अडून राहिलेल्या मुलींचे विवाह जर चिंतेचा प्रश्न ठरू शकत असेल, तर त्यावरची आजपर्यंत सर्वांना अनभिज्ञ असलेली वैद्यकशास्त्राजवळची रोखठोक उपाययोजना म्हणजे ‘प्लॅस्टिक सर्जरी.’ एखाददुसऱ्या वैगुण्यामुळं सौंदर्याला मुकलेल्या मुलींच्या पुढच्या समस्यांना एकमेव आणि सर्जनशील उत्तर केवळ प्लॅस्टिक सर्जरीतच सापडू शकेल.
भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशात प्लॅस्टिक सर्जरी ही शाखा फारशी प्रचलित नाही, परंतु आज परदेशात मत्र असंख्य तरुणींचे यक्षप्रश्न ह्या शाखाने सोडवले आहेत. तेव्हा “प्लॅस्टिक सर्जरी” म्हणजे काय ह्याची ओळख करून घेणे आणि शास्त्रीय दृष्टिकोणातून ह्यची स्त्रियांना कितपत उपयुक्तता आहे हे पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

प्लॅस्टिक सर्जरीचा उगम
‘प्लॅस्टिक सर्जरी’ वास्तविक नवीन नाही. प्राचीन भारतातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक ‘सुश्रुत’ यांनी सुमारे इ.स. पूर्व ६०० वर्षे ह्या शल्यतंत्राचा उपयोग करून कानाची पाळी व नाक गालाच्या कातडीच्या सहाय्याने ठाकठिक केली होती. ह्या काळात भारतीय संस्कृतीवरील चीन व इजिप्त येथील संस्कृती जगामध्ये आघाडीवर होती. ह्या दोन्ही संस्कृतींमध्ये या शल्यतंत्राचा उल्लेखही नाही. तेव्हा ‘प्लॅस्टिक सर्जरी’ चा उगम भारतामध्ये झाला आहे हे सिद्ध होते आणि आपल्याला त्याबद्दल अभिमान वाटण्याजोगे आहे. अलीकडच्या काळात ह्या शास्त्रामधील प्रचंड प्रगती मात्र पाश्चिमात्य देशात झाली आहे.

प्लॅस्टिक सर्जरीत प्लॅस्टिक नसते.
प्लॅस्टिक शल्यतंत्राचा अलीकडेच प्रसार झाल्यामुळं ह्या तऱ्हेच्या शस्त्रक्रियेत प्लॅस्टिकचा वापर होतो का ? असा प्रश्न विचारणारे अनेक आहेत. आपल्याला माहिती असलेल्या दैनंदिन वापरातील प्लॅस्टिक पदार्थांचा ह्या “प्लॅस्टिक सर्जरी” शी सुतराम संबंध नाही ह्या तऱ्हेच्या शस्त्रक्रियेला “प्लॅस्टिक” हे नाव जर्मनीतील झाईस याने ठेवले ते प्लॅस्टिकॉस ह्या ग्रीक शब्दावरून. “प्लॅस्टिकॉस” म्हणजे ज्या शस्त्रक्रियेद्वारा शरीराच्या भागाला आकार देण्यात येतो अतह्वा नसलेला भाग घडविण्यात येतो त्या शस्त्रक्रिया प्रकाराला “प्लॅल्टिक सर्जरी” म्हणतात.

अगदी लहान बालकापासून उतारवयातील लोकांपर्यंत वेगवेगळ्या अनेक विकृतीसाठी प्लॅस्टिक सर्जरी उपयोगी पडते.
जन्मतःच विकृती असलेली मुलं मातेच्या मनाला अत्यंत क्लेषकारक होतात. उपजत दुभंगलेला ओठ, चेहऱ्यावरील जन्मखुणा ( काळे डाग, ‘मस’ लाल रंगाचे डाग व उंचवटे ), बोटांच्या विकृती ( चिकटलेली बोटे किंवा कमीच बोटे ), जननेंद्रियांच्या विकृती इत्यादींसारख्या विकृती लहान वयात मुलाला जरी फारशा त्रासदायक नसल्या तरी त्याच्या आई-वडीलांच्या मनाला निश्चितच दुःकदायक असतात. अशा प्रसंगी मुलाची विकृती सुव्यवस्थित करून आई- वडिलांच्या मनाचा क्लेष नाहीसा करणे हे केवळ प्लॅस्टिक सर्जरीनेच होऊ शकतं. त्याच विकृती खुद्द त्या व्यक्तीला पुढील आयुष्यात क्लेषकारक ठरतात व तिला त्या विकृती तेव्हा नीट करून घेण्यासाठी प्लॅस्टिक सर्जन गाठावा लागतो.

प्लॅस्टिक सर्जरी आणि स्त्री
स्त्रियांच्या बाबतीत विशेषकरून उपयुक्त असलेली प्लॅस्टिक सर्जरी दोन तऱ्हेच्या बाबतीत उद्भवते, पहिली म्हणजे भाजण्याने होणाऱ्या जखमा व त्यामुळे होणाऱ्या विकृतींबाबत, आपल्या देशात हा प्रश्न फार मोठ्या स्वरूपाचा आहे. स्त्रियांचे बरेचसे आयुष्य विस्तवपाशीच जात असल्याने भाजण्याचे प्रकार त्यांच्यात होणं स्वाभाविक आहे. वेळीच म्हणजे भाजल्याने झालेल्या जखमांवर प्लॅस्टिक सर्जरीतील ‘त्वचा रोपण’ तंत्राने पुन्हा कातडी बसविल्यास जखमा लौकर बऱ्या होतात. विद्रुपता येत नाही व अवयव आखडत नाहीत. जर वेळीच हे उपचार झाले नाहीत तर नैसर्गिकरित्या जखम बरी होऊन अवयव आखडतात आणि हालचाल करता येत नाही, सदर अवयवांची हालचाल पुन्हा चालू करण्यास प्लॅस्टिक सर्जरीशिवाय उपाय नाही.

सौंदयासाठी प्लॅस्टिक सर्जरी
दुसऱ्या तऱ्हेची स्त्रियांच्या बाबतीतील प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे सौंदर्यवर्धासाठी लागणारी. आपण जर स्त्री सौंदर्याचा विचार केला तर ते थोडक्यात सुंदर चेहरा व सुडौल बांधा ह्यात सामावलेले आहे हे पटेल.नाकाविषयी बोलणे झाल्यास सौंदर्याचा आणि नाकाचा किती सबंध आहे ते नाक कापून चेहरा विद्रूप करण्याचे कित्येक प्रकार घडतात त्यावरून समजेल, भांडणात शिक्ष म्हणून, नाके चाऊन किंवा कापून टाकण्यात येतात. नाक हे चेहऱ्याच्या मधोमध केंद्र स्थानी आहे व त्यामुळे नाकाची थोडीशीदेखील विकृती लगेच लक्षात येते. कानाची विकृती एकवेळ पदराने किंवा केसाने लपविता येते; डोळ्यांची गॉगलने- पण नाक लपविणे जवळ जवळ अशक्यच आहे. नाकाच्या बाबतीत प्लॅस्टिक सर्जरीने किमयाच केली आहे. बसकं, नटकं, नाक उंच करणं, मोठे किंवा बाकदार नाक छोटं करणे हे सर्व काही कुशल प्लॅस्टिक सर्जन करू शकतो. नाकावरील सर्व ऑपरेशन्स बाहेरील बाजूस कोणताही वण निर्माण न करता पार पाडता येतात.

वाढत्या वयोमानाप्रमाणे चेहऱ्याची कातडी सैल होऊ लागते व सुरकुत्या दिसू लागतात. ह्या सुरकुत्याही काढून टाकता येतात आणि स्त्रीचे दृष्य वय१५-२० वर्षांनी कमी करता येते !कित्येक मुलींची, सौंदर्याने दिली साथ पण पुटकुळ्यांनी केला घात, अशी स्थिती होते. तरुणपणी येणाऱ्या पुटकुळ्या चेहऱ्याच्या कातडीवर बारीक बारीक खड्डे ठेऊन जातात. अशा खडबडीत कातडीला पुनाश्च नितळ बनविणे हे प्लॅस्टिक सर्जनच फक्त करू जाणे देवीच्या वणांनी खराब झालेले कित्येक चेहेरे ह्या तंत्राने खूपच सुधारण्यात आले आहेत.

“सुडौल बांधा” ह्याविषयी बोलायच म्हणजे मुख्यतः वक्षःस्थळं व पोटाचा आकार यांचा विचार करावा लागतो. चांगला बांधा दिसण्यासाठी वक्षःस्थळे उंचीच्या मानाने प्रमाणबद्ध असावी लागतात. बऱ्याचवेळा ती वाजवीपेक्षा लहान किंवा मोठी किंवा ओघळलेली असतात. लहान वक्षःस्थळे मोठी करणे व मोठी ओघळलेली योग्य आकारात लहान करणे हे प्लॅस्ठिक सर्जरीनं जमतं.

पाश्चात्य देशात ह्या प्रगल्भ शास्त्राचा उपयोग एक सहज सुलभ आणि निश्चित उपाययोजना देणारे म्हणून फार मोठ्या प्रमाणात मान्यता पावून आहे. आपल्याही देशात लोकांची ह्या शास्त्राबद्दलची अनभिज्ञता, अंधकार लवकरच लयाला जाऊन त्यांच्या विकृतीवर निश्चित मलमपट्टी म्हणून प्लॅस्टिक सर्जरी ही एक प्रचलित पद्धत म्हणून झपाट्यानं आकार घेऊ शकेल. यासाठी स्त्रियांनीही ह्या नवीन विज्ञानाबाबत पुढे येऊन माहिती करून घेणं ही आवश्यक गोष्ट आहे.