प्रवासी आणि ज्योतिषी

एक ज्योतिषी दुर्बिणीतून आकाशातील ताऱ्यांचे वेध घेण्यात गुंतला असता, त्याचा पाय चुकून एका खड्डयात पडला. ते पाहून, तिकडून एक प्रवासी चालला होता तो त्यास म्हणाला, ‘मित्रा, आकाशातील ताऱ्यांचे मार्ग ठरलेले आहेत, त्या मार्गांनी ते खुशाल जातील येतील; पण आपली स्थिती तशी नाही. आपल्या रस्त्यात खाचखळगे फार आहेत, तेव्हां त्यांचे वेध घेत बसण्यापेक्षा ह्या खळग्यांकडेच विशेष लक्ष देणे आपल्या अधिक फायदयाचे नाही काय ?’

तात्पर्य:- दुसऱ्यास उपदेश करणारे पण स्वतःत्या उपदेशाप्रमाणे न वागणारे लोक लोकांच्या निंदेस पात्र झाल्याशिवाय रहात नाहीत.