पूजेचे साहित्य

अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर, पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोड गूळ)
तांब्या, भांडे, ताम्हण, अभिषेकपात्र ही सर्व पूजेची भांडी तांब्या पितळेची-शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.
गंध-चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
अक्षता- धुतलेल्या अखंड तांदुळांना कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या. शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
हळद- कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही पूजा साहित्यात असावा. गणपतीला सेंदूर, विठ्ठला बुक्का वाहण्याची वहिवाट आहे.
फुले- ऋतुकलोद्भव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासितक फुले देवाला वाहावी.
जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले देवाला चालतात.
विष्णुला- चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
शंकराला- पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
गणपतीला- गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात.
गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.
विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही. देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.

देवपूजेचे साहित्य

देवपूजेचे साहित्य

दूप- देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा
देवाला निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये. समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
नैवैद्य- रोजच्या पूजेत देवाना पंचामृतांचा नैवैद्य दाखवितात. दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात. विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.
फळे- देवाला कच्ची फळें वाहू नयेत. पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.
तांबूल- म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे. पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
नमस्कार -दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.
आरती – देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
प्रदक्षिणा – देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात, आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
प्रार्थना – देवाला नमस्कार करून त्याची प्रार्थना करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत किंवा त्याला सांकडे घालू अन्ये. फक्त त्याची कृपा मागावी. देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात. प्रार्थना आणि सर्व पूजा एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी.