पुणे स्टेशनवर

एकदा सोपानदेव चौधरी पुणे स्टेशनवर उतरले आणि डेक्कन जिमखान्यावर जाण्यासाठी त्यांनी रिक्षा भाड्याने ठरवली.

रिक्षावाल्याने रिक्षा सुरु केली आणि तिच्या वेग एवढा वाढवला की विचारता सोय नाही.

त्याची गती पाहून, घाबरलेले सोपानदेव म्हणाले, ‘बाबा रे, मला डेक्कनला जायचंय, मला अंतरिक्षात घेऊन जाऊ नकोस.’