आपल्या कविता,लेख,पाककृती मराठीमातीवर प्रसिद्ध करा, आजच आपले साहित्य पाठवा.

रखिया बडी

साहित्य:

  • अर्धा किलो उडीद डाळ बिन सालाची
  • पांढरा कोहळा(पापडकरता वापरतात तो. याला छत्तीसगडमध्ये रखिया म्हणतात)
  • चवीपुरते मीठ

कृती:

उडीद डाळ पाच-सहा तास भिजत घालावी. नंतर ती वाटावी. त्यात दीड वाटी कोहळ्याचा कीस, थोडे मीठ घालून त्याच्या तळहातावर गोल बिस्किटाएवढय़ा वडय़ा करून उन्हात वाळवाव्या. या मिश्रणांत कोहळ्याचा कीस घालण्याऐवजी मेथीची भाजी चिरून (एक वाटी) घालता येते. या वडय़ा तेलात परतून कांदा, टॉमेटोच्या रश्श्यात घालाव्यात. ही छत्तीसगडची पाककला आहे.

वर्ग: , ,

प्रतिक्रिया द्या

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *

*
*