रसगुल्ला

साहित्य:

  • दीड लीटर दूध
  • ३ वाट्या पाणी
  • अर्धा चमचा रोझ इसेन्स
  • २ टे. स्पून मैदा.

कृती:

दुधाला उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व थोडी तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे, ते दूध एका कपड्यावर ओतून पुरचुंडीप्रमाणे बांधून ठेवावे. सर्व पाणी निथळू द्यावे, हाताने पिळू नये. अशा रीतिने पनीर करवे. नंतर पनीर मळूने घ्या. त्यात मैदा घालून मळावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावे. साखरेत ५ कप पाणी घालून उकळावे. उथळ पातेल्यात करावे. नंतर त्यात वरील गोळे घालून मंदाग्नीवर थोडा वेळ उकळू द्यावे.रसगुल्ले तरंगू लागले की पाकात रोझ इसेन्स घालावा.