रताळे कचोरी

साहित्य :

 • पारीसाठी रताळी पाव किलो
 • बटाटा मोठा एक
 • थोडे मीठ
 • थोडे वरई पीठ

सारणासाठी साहित्य :

 • खोबरे खवून एक वाटी
 • बेदाणा ५० ग्रॅम
 • मूठभर चिरून कोथिंबीर
 • हिरव्या मिरच्या चार
 • थोडी साखर
 • मीठ
 • तळणीसाठी तूप

कृती :

बटाटा व रताळी उकडावीत. साले काधून कुस्करून त्यात थोडे मीठ घालून पुरणयंत्रातून हे मिश्रण काढून घ्या. नंतर थोडा तुपावर मिरच्याचे तुकडे करून परतून घ्या. परतल्यावर खाली उतरून त्यात सारणासाठी घेतलेले सर्व पदार्थ टाकून, कालवून सारण तयार करावे.यानंतर रताळे बटाट्याचे मिश्रणाची पारी करावी. त्यात मावेल एवढे सारण घालावे. कचोरी तयार करून ठेवा. नंतर कढईत तूप गरम करावे. कचोऱ्या वरईच्या पिठात थोड्या घोळून तुपात तळाव्यात. गरम असतानाच खायला द्या.