रताळ्याचे सांडगे

साहित्य:

  • एक किलो पांढरी किंवा लाल-पिवळसर रताळी

कृती:

रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्यावीत. कुकरमध्ये चाळणीत ठेवून किंवा नुसत्या पाण्यात उकडावी. थोडी गार झाल्यावर सालं काढून छान कुस्करून घ्यावीत. कणकेप्रमाणे मळून घ्यावे. नंतर शेवगा असल्यास त्यांच्या भांडय़ात एक एक गोळा घालून वरून दाब द्यावा. प्लास्टिकवर शेवाचा पसरट गुच्छ टाकावा व लगेच उन्हात स्वच्छ पांढऱ्या चादरीवर वाळवण्यास टाकावा. दोन-तीन दिवस उन्हात वाळवल्यावर पूर्ण वाळलेले गुच्छ बंद पत्र्याच्या डब्यात ठेवाव्यात, म्हणजे त्या नरम होत नाहीत. पाऊस सुरू झाला की हे सांडगे तळून खावेत.