रवा बेसन लाडू

साहित्य :

  • ४ वाट्या बारीक रवा
  • १ वाटी डाळीचे जाडसर पीठ
  • ४ वाट्या साखर
  • १ वाटी डालडा तूप
  • ७-८ वेलदोड्यांची पूड
  • अर्ध्या जायफळाची पूड.

कृती :

तुपावर रवा व डाळीचे पीठ वेगवेगळे भाजून घ्यावे. कधीही दोन्ही एकत्र करून भाजू नये. भाजून झाल्यावर दोन्ही एकत्र करा.साखरेत २ वाट्या पाणी घालून एकतारी पाक करा. नंतर पाकात भाजलेला रवा व डाळीचे पीठ घालूअन घोटा. वेलदोड्यांची पूड व जायफळाची पूड घालावी व मिश्रण झाल्यावर लाडू वळावे.