रव्याच्या वड्या

साहित्य :

  • १ वाटी बारीक रवा
  • १ वाटी तूप किंवा डालडा
  • ४ वाट्या दूध
  • ४ वाट्या साखर
  • ४-५ थेंब बदामाचा इसेन्स
  • ३-४ थेंब हिरवा रंग

कृती :

एका जाड बुडाच्या पातेलीत रवा, तूप, साखर दूध एकत्र करावे. चुलीवर ठेवून सतत ढवळावे. आंच प्रखर करावी. मिश्रण घट्टसर ठेवून कडेने सुटू लागले की खाली उतरावे. अर्धा चमचा मिश्रण ताटलीत टाकून पाहावे. त्याची मऊ गोळी झाली पाहिजे. म्हणजे मिश्रण तयार झाले असे समजावे.

रंग इसेन्स घालून पुन्हा घाटावे व तुपाचा हात फिरवलेले ट्रेमध्ये ओतावे. जरा कोमट झाल्यानंतर वड्या कापाव्या व अगदी गार झाल्यानंतर सुट्ट्या करावे.