रव्याची वडी

साहित्य :

  • १ वाटी रवा
  • १ वाटी दूध
  • १ वाटी तूप
  • १ वाटी ( गच्च दाबून) ओले खोबरे
  • ३ वाट्या साखर
  • २-३ वेलदोड्यांची पूड ( सजावटीसाठी)

कृती :

वेलदोड्यांखेरीज सर्व पदर्थ एकत्र करून मिश्रण चुलीवर ठेवावे व सतत ढवळावे. हातावर एक जाड नॅपकीन, गुंडाळावा. नाहीतर मिश्रणाचे कढत थेंब हातावर उडतात. साधारण२०-२५ मिनिटात मिश्रण आळायला लागते. चमचाभर मिश्रण ताटलीत टाकून पहावे. घट्ट गोळी झाली तर लगेच तुपाचा हात फिरवलेल्या ताटलीत टाकून पहावे. घट्ट गोळी झाली तर लगेच तुपाचा हात फिरवलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये मिश्रण ओतावे व बाजू ठोकून सारखे करावे. बहुधा या वडीला बऱ्यापैकी जाळी पडते. थोड्या वेळाने (५ मिनिटांनंतर) वड्या कापाव्या.

जाळी पडली तर रव्याचा म्हैसूरपाक म्हणायचं आणि नाहीच पडली तर आहेत आपली नेहमीची वडी!