साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी

साहित्य :

  • पाव किलो साबुदाणा
  • दोन वाटी दाणेकूट
  • ४/५ हिरव्या मिरच्या
  • तूप चार लहान चमचे
  • थोडे जिरे
  • नारळाचा ताजा खव चार लहान चमचे
  • थोडी कोथिंबीर चिरून
  • चवीसाठी थोडी साखर
  • मीठ

कृती :

साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी

खिचडी करण्याआधी निदान २ तास साबुदाणा भिजवून ठेवा. नंतर त्यात साखर, मीठ चांगले मिसळा, पातेल्यात तूप गरम करा. त्यात जिरे घाला. ते तडतडू लगले की त्यात मिरची वाटून किंवा तुकडे करून घाला. नंतर साबुदाणा घाला. मिश्रण ढवळून घ्या. मग त्यात दाणेकूट घाला. मिश्रण ढवळून परत. जरूर पडली तर वरून दुधाचा हलकासा हबका मारा. मऊसर वाफवा. वरून नारळ खव आणि कोथिंबीर पेरा. गरम-गरम खा.