साबुदाण्याचे निराळे वडे

साहित्य :

  • १ वाटी साबुदाणा
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • १ वाटी तांदळाचे पीठ
  • ३ कांदे
  • १ टोमॅटो (आवडीनुसार)
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ चमचे मीठ
  • तळण्यास तेल
  • ५-६ हिरव्या मिरच्या

कृती :

साबुदाणा निदान दोन तास तरी धुवून झाकून ठेवावा. मीठ व मिरच्या वाटून घ्याव्या. कांदे व टोमॅटो बारीक चिरावे. भिजलेला साबुदाणा व पिठे एकत्र करावी. त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व वाटलेली मिरची घालावी. थोडेसे पाणी घालून मिश्रण कालवावे. नंतर त्याचे छोटे वडे करावे व तेलात तळावे.

चटणी किंवा आंबटगोड लोणच्याशी खायला द्यावे.