साबुदाण्याची भजी

साहित्य :

  • दोन वाटी साबुदाणा
  • २/३ उकडलेले बटाटे
  • तिखट
  • मीठ
  • शिंगाडा पीठ दीड वाटी
  • चहाचा दीड चमचा ओल्या मिरच्याचे वाटण
  • जिरे भाजून कुटून दोन चिमटी
  • तूप
  • थोडी चिरलेली कोथिंबीर

कृती :

साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, जिरेपुड, मिरची वाटण, मीठ, कोथिंबीर घेऊन चांगले मळून मिश्रण एकजीव करा. शिंगाडा पिठात तिखट-मीठ घालून दाटसर (भज्यासाठी नेहमी भिजवतो तसे) भिजवून घ्या. कढईत तूप गरम करा. मळलेल्या गोळ्याचे लहान-लहान गोळे घेऊन कालवून ठेवलेल्या शिंगाडा पिठात बुडवा. गरम तुपात टाकून खरपूस तळा. उपवासाच्या चटणी बरोबर गरम असतानाच खा.