साबुदाण्याची लापशी

साहित्य :

  • १ टेबलस्पून साबुदाणा
  • १ कप दूध
  • २ चमचे साखर

कृती :

साबुदाण्याची लापशी

साबुदाण्याची लापशी

साबुदाणा थोडा वेळ धुऊन ठेवावा. नंतर १/२ कप पाण्यात शिजवून घ्यावा.

वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. नंतर त्यात दूध व साखर घालूनथोडा वेळा शिजवावे.

मग खाली उतरवून गार किंवा गरम आवडीप्रमाणे लापशी द्यावी.

आयत्या वेळी त्यात चिमूटभर मीठ टाकल्यास ही लापशी खूप छान लागते.