संपूर्ण कैरीचे लोणचे

साहित्य:

  • ५ किलो कैरी
  • २५० ग्रा. शोप
  • १०० ग्रा. हळद
  • १२५ ग्रा. लाल मिरची
  • २५० ग्रा. मेथी
  • २५० ग्रा. मीठ
  • १० ग्रा. हिंग
  • १॥ किलो सरसो तेल

कॄतीः

संपूर्ण कैरीचे लोणचे

संपूर्ण कैरीचे लोणचे

देशी कैरी पाण्याने धुवून चांगल्या तऱ्हेने पुसून घ्यावे. आता यांचे शेवटचे टोक सोडुन दोन भागात कापावे आणि कोय काढुन घ्यावी. हळद, लाल मिरची, मिठ, हिंग वाटुन घ्यावे.

मेथीस बारीक करावे, त्यानंतर ५०० ग्रा. तेल स्टीलच्या मोठ्या भांड्यात काढुन घ्यावे त्यात सर्व मसाला चांगल्या तर्‍हेने मिळवावा. नंतर एक एक कैरी घेऊन त्यात मसाला भरावा. तसेच काचेच्या बरणीत किंवा मातीच्या भांड्यात ठेवत जाव्या.

त्यानंतर बरणीला उन्हात ठेवावे किंवा घरात ८ दिवस राहू द्यावे त्यानंतर १ किलो तेल लोणच्या वरून भरावे. एक आठवड्यानंतर यास खाऊ शकता.