संदेश

साहित्य:

  • १ लीटर दूध
  • १००ग्रॅम पिठीसाखर
  • ८-१०पिस्ते
  • ५-६ बदाम
  • १ लिंबू
  • पाव चमचा रोझ इसेन्स.

कृती:

दूधाचे पनीर तयार करावे. नंतर ते पनीर वाटून घ्या. मिक्सरमधेही चालेल. नंतर त्यात पिठीसाखर घालून ते मिश्रण मंदाग्निवर शिजवावे. त्यात इसेन्स घालावा. घट्ट झाले की ताटात थापावे. नंतर त्याच्या वड्या पाडाव्या. बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवावे.संदेश करण्यासाठी लाकडी साचे मिळतात; त्यात लिंबाएवढा गोळा घालून दाबावे व काढावे. वरुन बदाम- पिस्ते लावावे. आवडत असल्यास वरील पनीरमध्ये लाल किंवा पिवळा रंग घालून करावे.