संत्र्याची बासुंदी

साहित्य :

  • १ कंडेन्सड मिल्कचा डबा
  • १ बाटली दूध
  • ६ मोठी संत्री
  • अर्धा वाटी साखर
  • थोडे बदाम-पिस्त्याचे काप
  • थोडी चारोळी.

कृती :

संत्री सोलून त्याच गर काढावा. नंतर त्यात अर्धी वाटी साखर घालून फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा.कंडेन्स्ड मिल्कचा डबा फोडून, त्यातले दूध एका पातेल्यात काढून घ्या. त्यात १ बाटली तापवून गार केलेले दूध घाला. नंतर त्यात चारोळी, बदाम पिस्त्याचे काप घाला व फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा. आपत्या वेळी दुधात संत्र्याचा गर घालून काढा.