साडी ऑन रेड कार्पेट

साडी ऑन रेड कार्पेट

भारतीय संस्कृतीत साडी हा वेषभूषेचा अविभाज्य घटक मानला जातो. साडी हा शब्द `शाटी’ या संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. शाटी म्हणजॆ लांबलचक कापड. बदलत्या काळानुसार साडीही अनेक सिथ्यांरातून गेली आहे, ग्लोबलायझेशनच्या जमान्यात साडी इतर पेहरावांच्या तुलनेत मागे पडली. भारतीय जनमानसावर चित्रपटसृष्टीचा प्रचंड पगडा आसल्याने आपल्या संस्कृतीतून साडी हा प्रकार लुप्त होतो कि,काय अशी भिती निर्माण झाली होती. परुंतू ’जुनं ते सोनं’या म्हणीनूसार साडीला खरेच सोन्याचे दिवस आले असेच म्हणावे लागेल.हिंदी चित्रपटांमध्ये सुरवातीच्या काळात नट्या साडीच असायच्या, त्यांच्या लांबसडक केसांच्या वेण्या,आणि साडया यामुळे त्या नेहमीच सालस, गोंडस आणि निरागस वाटायच्या. लटक्या रागाने संवाद बोलून पदराचा चाळा करणं हा तर अनेक चित्रपटांमधे खुपच कॉमन दृश्य होते. नुतन, तनुजा, मधुबाला अणि ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटचा जमाना खूपच मेमोरेबल आहे. त्या नंतरच्या दशकात नट्यांच्या साडी नेसण्याच्या पध्दीतीत थोडे बदल झाले. पदर थोडा आणखी वर गेला पदराच्या चाळ्याची जागा ओढणी घेऊ लागली. हेमामालिनी, आशा परेख, यांच्या अभिनयातले मुरके झुरके जसे वाढले तसेच साडी नेसण्याच्या पध्दीतीत ही थोडे बदल झाले. त्यानंतरच्या काळात भारतीय सिनेमांनी कात टाकायला सुरवात केली. असंख्य प्रकारचे पेहराव आले. नट्यांचे कॉसच्युमचा प्रवास साडी, सलवार-कमीज, मिडी असा होत थेट बिकीनीपर्यंत येऊन ठेपला. अंगप्रदर्शन तर नट्यासाठी मैलाचा दगड ठ्ररला. या कळात तर साडीने जवळ जवळ आपले अस्तित्व हरवलं. परंतू याच साडीला गतवैभव प्राप्त करुण देण्याचं श्रेय अभिनेत्री विद्या बालनला दिले पाहिजे. झिरोफिगर, अंगप्रदर्शन हे आघाडीच्या नट्यासाठी असलेले मापदंड जुगारुन तीने स्वता:बरोबरच साडीला ही ग्लॅमर प्राप्त करुन दिले. (याला काही अपवाद आहे)

रेखा,विदया,राणी या नट्या तर चित्रपटांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमात साडीतच दिसतात. मागील वर्षी कांन्स महोस्तावात तर ऎश्वर्या राय हिने घातलेल्या साडीमुळे तिचे सौंदर्य अजूनच बहरलं. टि.व्ही मालिकांमध्ये तर साडीला अनन्ययसाधारण महत्त्व आहे. बॉलिवूडमध्ये ऑवार्ड फंक्शन असोत किंवा इतर काही, साडी रेड कार्पेट वर नुसतीच दिसायला नव्हे तर चमकायला लागली असचं म्हाणावे लागेल. हल्ली तर अनेक कॉलेज युवतींच्या वॉरड्रॉबमध्ये जीन्स, टॉप्स, केप्री यांबरोबरच साडीही असतेच. सामान्य भारतीय स्त्रीसाठी तर साडी हा जिव्हाळ्याचा विषय. गंमतीचा भाग म्हणजे अनेकदा लग्नसमारंभात मानपानावरुन होणार्‍या वादात साडी हाच मुख्य मुद्दा असतो. साडीमुळे स्त्रीच व्यक्तीमत्त्व खुलून येतं. आपल्या महिला राजकारणी इथे विसरुन चालणार नाही. राजकारण आपल्याकडे वाईटच समजले जाते.परंतु सुती साडयांमधल्या या महिला राजकारणी (कर्तृत्व कसेही असले तरी) किती सोज्वळ वाटतात. सोनिया गांधीचंच पाहा ना एक परदेशस्थ मुळ असलेली स्त्री कॉंग्रेस पक्षाची धुरा जेवढ्या शिताफीने संभाळते तेवढ्याच सह्जतेने साडीतही वावरते. आजकाल तर कॉरपरेट क्षेत्रातही उच्चपदावर असणार्‍या स्त्रीया साडीलाच प्राधान्य देतात. पण खरं कौतुक वाटते ते इतिहासातल्या राणंगिणीचं. राणी लक्ष्मीबाई लढल्या ते नऊवारीतच किंवा आपल्या तान्हुल्या साठी गड सर करुन जाणार्‍या हिरकणीला त्यावेळी ट्रॅक सूट नव्हता.

बाजारात तर साडयांचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. जॉर्जेट, शिफॉन, नेट, डिजायनर याबरोबरच आपल्या पारंपारिक साडयांचा पर्याय ही उपलब्ध आहेत. आता तर साडी घालणं हो नेसणं नाही घालणंच खूप सोपं झालं आहे. रेडिमेड निर्‍या असणार्‍या साडया बाजारात मिळत असल्याने त्या घालणं आणि त्यात वावरणं खूप सोपं झालं आहे. महाराष्ट्रात तर आता सण समारंभांना नऊवारी घालण्याचा ट्रेंन्ड आला आहे. याही नऊवारी बाजारात रेडिमेड मिळतात. साडीमुळे फेमिनाइन लूक मिळतो साडीत कितीही वैविध्यता आली तरी साडी हा प्रकार कधीच अश्लिल वाटणार नाही. पण हीच साडी तुम्हाला ‘हॉट किंवा कूल.’ लूक मिळवून देऊ शकतात.

बाजारात तर साडयांचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. जॉर्जेट, शिफॉन, नेट, डिजायनर याबरोबरच आपल्या पारंपारिक साडयांचा पर्याय ही उपलब्ध आहेत. आता तर साडी घालणं हो नेसणं नाही घालणंच खूप सोपं झालं आहे. रेडिमेड निर्‍या असणार्‍या साडया बाजारात मिळत असल्याने त्या घालणं आणि त्यात वावरणं खूप सोपं झालं आहे. महाराष्ट्रात तर आता सण समारंभांना नऊवारी घालण्याचा ट्रेंन्ड आला आहे. याही नऊवारी बाजारात रेडिमेड मिळतात. साडीमुळे फेमिनाइन लूक मिळतो साडीत कितीही वैविध्यता आली तरी साडी हा प्रकार कधीच अश्लिल वाटणार नाही. पण हीच साडी तुम्हाला ’हॉट किंवा कूल’ लूक मिळवून देऊ शकते.