सर्वांसाठी त्रोटक देवपूजा

प्रथम दोन वेळा आचम करावे. पुढे दिलेल्या २४ नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करून, प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. ( आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये. ) चौथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हनांत सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.
नंतर नावाचा उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा. सर्व नावे संपल्यावर प्राणायाम करावा.
(१) ॐ केशवाय नमः । (२) ॐ नारायणाय नमः । (३) ॐ माधवाय नमः । (४) ॐ गोविंदाय नमः । (५) ॐ विष्णवे नमः । (६) ॐ मधुसूदनाय नमः । (७) ॐ त्रिविक्रमाय नमः । (८) ॐ वामनाय नमः । (९) ॐ श्रीधराय नमः । (१०) ॐ हृषीकेशाय नमः । (११) ॐ पद्मनाभाय नमः । (१२) ॐ दामोदराय नमः । (१३) ॐ संकर्षणाय नमः । (१४) ॐ वासुदेवाय नमः । (१५) ॐ प्रद्युम्नाय नमः । (१६) ॐ अनिरुद्धाय नमः । (१७) ॐ पुरुषोत्तमाय नमः । (१८) ॐ अधोक्षजाय नमः । (१९) ॐ नारसिंहाय नमः । (२०) ॐ अच्युताय नमः । (२१) ॐ जनार्दनाय नमः । (२२) ॐ उपेन्द्राय नमः । (२३) ॐ हरये नमः । (२४) ॐ श्रीकृष्णाय नमः ।
येथून पुढे ध्यान करावे. ते असे की, हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावे व आपली दृष्टी आपल्या समोरील देवाकडे लावावी.
ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः । निर्विघ्नमस्तु । सुमुखश्चैकदंतश्च कपिली गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिषः ॥ धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ शुल्कांबरधरं देवं शशिवर्ण चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्‌ सर्वविघ्नोपशान्तये । सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेंषाममंगलम्‌ । येषां हृदिस्थो भगवान्‌ मंगलायतन हरीः ॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङऽघ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः । विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान्‌ । सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यर्थसिद्धाये ॥ अभीप्सितार्थसिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरैः । सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥ सर्वेश्वारब्धकार्येषु त्रयास्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशंतु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञाया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणॊ द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे ववस्वतमन्वतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुक * नाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षए अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ( येथे पूजा करणाराने स्वतः म्हणावे. ) मम आत्मनः पुराणोक्तफलप्राप्त्यर्थ अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्यआयुरारोग्याऐश्वर्यप्राप्त्यर्थ सकलपीडापरिहारार्थ मनेप्सितसकलमनोरथसिद्ध्यर्थम्‌ श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताप्रीत्यर्थ यथाज्ञानेन यथामिलितोपचारद्रव्यैः ध्यानावाहनादिषोडशोपचारपूजनमहं करिष्ये । ( उजव्या हातांत पाणी घेऊन ताम्हनांत सोडावे. ) तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थ महागणपतिस्मरणं करिष्ये । तथा तदंगत्वेन कलशशंखघंटापूजनं च करिष्ये । ( उजव्या हातांत पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. ) तांदुळावर सुपारी ठेवून तोच गणपति समजून पुढील सर्व उपचार वाहावे.
(* ज्या ठिकाणी `अमुक’ शब्द आला आहे. तेथे पूजेज्या दिवशी पंचांग पाहून त्याप्रमाणे संवत्सराचे नांव, तिथि व वाराचे नाव, तसेच त्या दिवशी असलेले नक्षत्र, ओग, करण, चंद्रद्राशि , सूर्यराशि व गुरुराशि यांचे उल्लेख करावे.)
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषू सर्वदा । ( या मंत्राने गणपतीचे स्मरण करावे व पुढील मंत्रानी कलश , शंख, घंटेची पूजा करावी. )
अथ कलशशंखघंटापूजनम्‌ । कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः । मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः । कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः । अंगैश्च सहिताः सर्वे कलशां तु समाश्रिताः। अत्र गायत्रीसावित्री शांतिपुष्टिकरी तथा । आयांतु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः । गंगे च यमुने चैव गोदावरिसरस्वती । नर्मदे सिंधू कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतः पुष्पं समर्पयामि । धेनुमुद्रां प्रदर्श्य ।
( आपल्या डाव्या बाजूस पूजेसाठी भरून घेतलेला जो तांब्या असेल त्याला गंध, अक्षता व फूल वाहावे. याला कलशपूजन म्हणतात. )
ॐ शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे । नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोऽस्तु ते ॥

ॐ पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि । तन्नःशंखः प्रचोदयात । ( चौरंगावर आपल्या उजव्या बाजुस ठेविलेल्या शंखास हातात घेऊन स्नान घालावे व पाणी भरून ठेवावा आणि गंधफूल वाहावे. ) * शंखाय नमः । गंधपुष्पं समर्पयामि । शंखमुद्रां प्रदर्श्य । आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्‌ । कुर्वे घंटारवं तत्र देवताहवानलक्षणम्‌ ( आपल्या डाव्या बाजूस ठेविलेल्या घंटेला उजव्या हातात घेऊन स्नान घालावे व वस्त्राने पुसून जाग्यावर ठेवावी. ) घंटायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । ( घंटा वाजवावी ) हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी । तथा दीपदेवताभ्यो नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
(* केवळ स्त्रिया जर पूजा करणार असतील तर त्यांनी शंखाची पूजा करू नये. )
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत्‌ पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शृचिः । पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत । ( या मंत्राने सर्व पूजेच्या साहित्यावर तुळशीपत्राने पाणी शिपडून त्याचप्रमाणे स्वतःच्या अंगावरहि पाणी शिंपडावे. )
अथ ध्यानम्‌ : (विष्णूचे ध्यान ) शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण सुभांगम्‌ । लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं । वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनायम्‌ ॥१॥ ( वरील मंत्र म्हणून विष्णूचे ध्यान करावे.)
अथ ध्यानम्‌ : ( शंकराचे ध्यान ) ध्योयेन्नित्यं महेश रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं । रत्नाकल्पज्ज्वलांगं परशुमृगवरभीतिहस्तं प्रसन्नम्‌ । पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तीं वसानं । विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं । (वरील मंत्र म्हणून शंकराचे ध्यान करावे. )
अथ ध्यानम्‌ : ( गणपतीचे ध्यान ) वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । ( वरील मंत्र म्हणून गणपतीचे ध्यान करावे. )
अथ ध्यानम्‌ : ( सूर्याचे ध्यान ) ध्येयः सदा सवितृमंडलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसंनिविष्टः । केयूरवान्मकरकुंडलवान्‌ किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशंखचक्रः ॥ ( वरील मंत्राने सूर्यांचे ध्यान करावे. )
अथ ध्यानम्‌ । (देवीचे ध्यान )
नमो प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्‌ ॥
(वरील मंत्र म्हणून देवीचे ध्यान करावे. )
श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमो नमः । ( असे म्हणू महविष्णुप्रमुखपंचायतदेवतेला नमस्कार करावा. ) आवाहर्थे अक्षतन्‌ समर्पयामि । ( असे म्हणून देवाला अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करावेत ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । आसनर्थे तुलसीपत्रम्‌ समर्पयामि । ( देवाला तुळशी वाहाव्यात .) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतन नमः । पाद्यं समर्पयामि । (देवाला स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । अर्घ्यं समर्पयामि । ( देवाला अर्ध्य म्हणजे गंध, अक्षता, पुष्पयुक्त जल म्हणजे पाणी घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । पयःस्नानं समर्पयामि । ( देवाला दुधाने स्नान घालावे. ) पयःस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि ( या मंत्राने देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । दधिस्नानं समर्पयामि । ( देवाला दह्याने स्नान घालावे ) दधिस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । घृतस्नानं समर्पयामि । ( देवाला तुपाने स्नान घालावे. ) घृतस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( शुद्ध पाण्याने देवाला स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । मधुस्नानं समर्पयामि । ( देवाला मधाने स्नान घालावे. ) मधुस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला शूद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । शर्करास्नानं समर्पयामि । ( देवाला साखरेचे स्नान घालावे. ) शर्करास्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । गंधोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला गंधाच्या पाण्याने स्नान घालावे . ) गंधोदकस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्ययामि । ( देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । ( देवाला गंध लावावे. ) अलंकारार्थे अक्षतान्‌ समर्पयामि । ( देवाला अक्षता वाहाव्यात. ) पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि । ( देवाला फुले वाहावीत. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि । दीपं समर्पयामि । ( देवाला धूप आणि नीरांजनाचा दिवा ओवाळावा. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । पयादिपंचामृतनैवेद्यं समर्पयामि । ( देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. ) ॐ प्राणाय नमः । ॐ अपानाय नमः । ॐअ व्यानाय नमः । ॐ उदानाय नमः । ॐ समानाय नमः । ॐ ब्रह्मणे नमः । पानीयं समर्पयामि । ( या मंत्रानी उदक सोडावे. ) उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदन समर्पयामि । ( दोन वेळां उदक सोडून देवाला गंध लावावे. ) मुखवासार्थे पूगीफलतांबूल समर्पयामि । ( पानाचा विडा, सुपारी देवापुढे ठेवावी. ) दक्षिणां समर्पयामि । ( देवापुढे विड्यावर दक्षिणा ठेवावी. ) मंत्रपुष्प समर्पयामि । ( या मंत्राने देवाला फूल वाहावे. ) अनेन पूर्वाराधनेन श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताः प्रीयन्ताम्‌ । उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकस्नानं समर्पयामि । ( प्रथम उदक सोडून देवावर वाहिलेले फूल काढावे व वास घेऊन उत्तरेच्या बाजूला ठेवावे. नंतर पुरुषसूक्त , अथर्वशीर्ष, रुद्र किंवा श्रीसूक्त याने देवावर अभिषेक करावा. ) अभिषेकानंतर ` सुप्रतिष्ठितमस्तु ।’ ( असे म्हणुन देवाला वस्त्राने पुसुन योग्य जागी ठेवावे. ) वस्त्रोपवस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षतान्‌ समर्पयामि । ( असे म्हणून देवाला यज्ञोपवीत किंवा उपवस्त्र अर्पण करावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । चंदनं समर्पयामि । ( देवाला गंध लावावे. ) अक्षतान्‌ समर्पयामि । पुष्पं समर्पयामि । ( देवाला अक्षता व फुले वाहावीत. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यम समर्पयामि । ( देवाला हळद कुंकू वाहावे. ) नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि । ( देवाला अनेक सुवासिक वस्तु वाहाव्यात ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि । दीप समर्पयामि । ( देवाला धूप, व नीरांजन ओवाळावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । नैवेद्यं समर्पयामि । ॐ प्राणाय नमः । ॐ अपानाय नमः । ॐ व्यानाय नमः । ॐ उदानाय नमः । ॐअ समानाय नमः । ॐ ब्रह्मणे नमः । ( देवाला नैवेद्य नै दाखवावा. )वेद्यमध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनम्‌ समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । ( दोन वेळा उदक सोडून देवाला गंध वाहावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायनदेवताभ्यो नमः । फलं समर्पयामि । ( देवापुढे फळ ठेवावे.) पूगीपलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ । कर्पूरैलासमायुक्तं तांबूल प्रतिगृह्यताम्‌ ॥ हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः । अनंतपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ॥ ( देवापुढे विडा व दक्षिणा ठेवावी. ) कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम्‌ । सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि ॥ श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । कर्पूरार्तिक्यं समर्पयामि । प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि ॥ ( वरील मंत्र म्हणून कापूर लावावा व प्रदक्षिणा करून नमस्कार करावा. ) मंत्रपुष्पं समर्पयामि । ( देवाला एक फूल वाहावे. ) आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्‌ । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर । मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे । अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्‌ कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर ॥ ( वरील मंत्रानी देवाची प्रार्थना करावी. ) अकालमृत्युहरणं सर्वव्यधिविनाशनम्‌ । विष्णुपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम्‌ । ( वरील मंत्र म्हणून झाल्यानंतर तीर्थे घ्यावे आणि नंतर ताम्हनात पाणी सोडून देवाला साष्टांग नमस्कार घालावा. )
अनेन कृतपूजननेन श्रीभगवान्‌ महाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताः प्रीयन्ताम्‌ । ॐ तत्सत्‌ ब्रह्मार्पणमस्तु ।

1 thought on “सर्वांसाठी त्रोटक देवपूजा

Comments are closed.