सायीचे गुलाबजाम

साहित्य :

  • १ वाटी घट्ट साय
  • अर्धी वाटी मैदा
  • चिमूटभर खायचा सोडा
  • २०-२५ बेदाणे
  • दीड वाटी साखर
  • अर्धा चमचा रोझ इसेन्स किंवा ४-५ वेलदोड्यांची पूड
  • तळण्यासाठी तूप.

कृती :

परातीत साय काढावी. परात कलतीकरून त्याखालचे दूध काढून बाजूला करा. नंतर त्यात मैदा व खायचा सोडा घालून हलक्या हाताने मिश्रण करा.त्याचे सुपारीएवढे गोळे करा. गोळे वळताना आत एकेक बेदाणा घालावा. कोरडा मैदा हाताला लावून ४-५ गुलाबजाम करा. तळून घ्या व पाकात टाका. साखरेत सव्वा वाटी पानी घालून एकतारी पाक करा. त्यात रोझ इसेन्स किंवा वेलचीपूड घाला. गुलाबजाम पाकात टाकताना पाकगरम असावा. पहिले तळून होईपर्यंत दुसरे ४-५ गुलाबजाम तळून घ्यावे.