२ सप्टेंबर दिनविशेष

वि. स. खांडेकर (११ जानेवारी १८९८ ते २ सप्टेंबर १९७६)

वि. स. खांडेकर

वि. स. खांडेकर

प्रसिद्ध मराठी कथा कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक. जन्म सांगलीचा. ‘घर कुणाचे’ ही त्यांची पहिली लघुकथा १९२३ मध्ये ‘महाराष्ट्र साहित्य’ ह्या मासिकामध्ये प्रसिद्ध झाली.

‘नवमाल्लिका’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह, नवमाल्लिका, पाकळ्या, समाधीवरची काही फुले, नवा प्रातःकाल हे काही कथासंग्रह. तसेच हृद्याची हाक, कांचनमृग, उल्का, दोन मने, ययाती इत्यादी त्यांच्या कांदबऱ्या.

जीवन व कला ह्यांना वाहिलेल्या ज्योस्ना ह्या मासिकाचे ते संपादक होते. १९६१ मध्ये त्यांच्या ययाती ह्या कांदबरीला महाराष्ट्र सरकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. ह्या कांदबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.

१९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी अधिवशनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. १९५७ साली मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांस ‘पद्मभूषण’ हा किताब दिला.

ठळक घटना

जन्म

  • १८८६ : थोर समाजसेवक, शिक्षक व साहित्यिक श्री. म.माटे (श्रीपाद महादेव माटे) यांचा जन्म.

मृत्यु