२८ सप्टेंबर दिनविशेष

लता मंगेशकर

लता मंगेशकर

लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना ‘लता-दीदी’ म्हणून ओळखले जाते.

लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिकर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

ठळक घटना

जन्म

  • १९२९ : स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या गायनकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्मदिन.

मृत्यु

  • १८९५ : लुई पाश्चरचा स्मृतिदिन.
  • १९२७ : देशभक्त अनंत हरी मिश्रा यांना फ़ाशी.