३ सप्टेंबर दिनविशेष

शाहीर साबळे

शाहीर साबळे

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे शाहीर कृष्णराव साबळे. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ या ओळी ऐकताना त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रत्यय येतो.

कृष्णराव केवळ मनोरंजनातून प्रबोधन करणारे शाहीर नाहीत, तर उत्तम कवी-गीतकार-संगीतकार, कुशल ढोलकीवादक, उत्तम अभिनेते-दिग्दर्शक, उत्कृष्ट व्यवस्थापक व संघटक, आणि उच्च प्रतीचे गायक आहेत.

‘मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं!’ असे पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते. (मनसे)

ठळक घटना

  • १९१६ : श्रीमती अ‍ॅनी बेझंट (ऍनी बेझंट) यांनी होमरुलची स्थापना केली.
जन्म
  • १९२३ : महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा जन्म झाला.
  • १८५५ : पंत महाराज बाळ कुद्रीकर यांचा जन्म झाला.
मृत्यु
  • १९८२ : थोर आध्यात्मिक विचारवंत दत्ता बाळ यांचे निधन.

2 thoughts on “३ सप्टेंबर दिनविशेष

Comments are closed.