७ सप्टेंबर दिनविशेष

दुर्गा खोटे

दुर्गा खोटे

मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री. जन्म मुंबई येथे. पूर्वाश्रमीचे आडनाव लाड.

महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह.

मोहन भवनानींच्या फरेबी जाल या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्याच बोलपटात त्यांनी तारामतीची भूमिका केली. दुर्गाबाईंनी अयोध्येचा राजा, मायामच्छिंद्र या प्रभातच्या चित्रांत आपली गाणी स्वतःच म्हटली होती.आतापर्यंत शंभरांहून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

पॉल झिलच्या अवर इंडिया व इस्माईल मर्चंट यांच्या हाऊस-होल्डर या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.त्यांची चित्रपटातील व नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला.

दिल्लीमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते (१९६१). त्यांना पद्मश्रीचा बहुमानही लाभला आहे. (१९६८). मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक त्यांना देण्यात आले होते (१९७२).

ठळक घटना

  • १९०६ : बँक ऑफ इंडियाची पहिली विदेशी बँक प्रारंभ.
  • १९९१ : जर्मन येथे भारत महोत्सव प्रारंभ झाला.

जन्म

  • १९०५ : दुर्गा खोटे यांचा जन्म झाला.
  • १८२४ : वैद्यक विषयातील श्रेष्ठ विद्वान व थोर सुधारक डॉ. भाऊ दाजी लाड यांचा जन्म.

मृत्यु

  • १९३५ – अमेरिकेचे सिनेटर ह्युपी लॉन्स यांची अंगरक्षकाकरवी हत्या झाली.