चावंड किल्ल्याचे फोटो

जुन्नरपासून सुमारे १५ किलोमीटरवर चावंड किल्ला आहे. जुन्नरहून – आपटाळे – कुकडेश्वर – पूर किंवा घाटघरला जाणार्‍या रस्त्याने एस.टी.ने चावंड फाट्यावर उतरायचे. फाट्यावर अर्धा-पाऊन तास चालत चावंडवाडीत आपणा येतो. येथुनच वर जाण्याची पायवाट आहे. ह्या किल्ल्यावर सात तळ्यांचा समूह आहे. खडकाच्या मोठ्या वर्तुळाकार भागा खडकाच्याच बांधांनी वेगवेगळी केलेली तळी आहेत. सर्व तळी पाण्याने तुडुंब भरुन असतात. किल्ल्यावरुन मागच्या बाजुला माणिकडोह व कुकडी जलाशयाचे मनोहरी दृष्य नजर खिळवून ठेवते.

किल्ल्यावर चढतांना दगडी कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍या हे वेगळे वैशिष्ट्य आहे. कुकडी नदीच्या उगमाजवळ असलेले प्राचीन शिल्पमंदिर याच रस्त्यावरुन पुढे पूर गावाजवळ आहे.

[nggallery id=23]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *