जंगली जयगड किल्ल्याचे फोटो

समुद्रसपाटीपासून ३३७६ फूट उंचीवर असलेला हा गड कोयनानगर पासून ११ कि.मी. अंतरावर असलेल्या नवजे गावापासून जवळ आहे. नावाप्रमाणे हिरव्या घनदाट जंगलात वसलेला हा गड निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे. कर्‍हाडहून कोयना नगरला जाऊन नवजे गावापर्यंत एसटीने किंवा खाजगी वाहनाने येथपर्यंत पोहोचता येते. जंगली जयगडावरुन कोयना धरणाच्या पाणसाठ्याचे दृष्य विलोभनीय दिसते. पश्चिमेकडे चिपळूणच्या दिशेने विस्तीर्ण कोकणाचे दर्शन होते. गडाचा माथा अरुंद व लहानसा आहे.

गडावरुन कोकणात जाणारा हेळवाक ते चिपळूण हा कुंभार्ली घाटातून जाणारा रस्ता नागमोडी वळणे घेत पोफळी गावापर्यंत उतरलेला दिसतो. गडाच्या बाजूने जंगलात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, रानफुले, वनस्पती आहेत.

[nggallery id=24]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *