कोंढाणे लेणीचे फोटो

राजमाची किल्ल्याच्या मागच्या बाजूला पायथ्याजवळ उल्हासदरीच्या डोंगराच्या पोटात ह्या लेण्या आहेत. चार लेण्यांचा हा समुह आहे. घनदाट झाडीत आणि गर्दीपासून दूर अशा रम्य वातावरणात ह्या लेण्या खोदल्या आहेत. पावसाळ्यात ह्या लेण्यांना जाता येत नाही. पावसाळा सोडून इतर वेळी जान्यासाठी रेल्वेच्या ठाकूरवाडी स्थानकापासून खाली उल्हास नदीच्या दरीत उतरत जावे. नदी पार करुन पलीकडच्या कोंदिवडे गांवात आपण पोहोचतो. गावापासून अंदाजे ३ कि.मी. अंतरावर वरच्या चढणिच्या वाटेने चालत गेल्यावर ह्या सुंदर लेण्यांमध्ये आपण पोहोचतो. हे सर्व अंतर पायी चालत जावे लागते.

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *