महाराष्ट्र फॅशन फाउंडेशन २०१२

पुरोगामी महाराष्ट्रात “फॅशन” हि संकल्पना रूजु होऊ पाहत आहे, “फॅशन” म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर अर्धनग्न कपडे व पाश्चात्य संस्कृतीचे पेहेराव येतात. आपण हे विसरत चाललोय की महाराष्ट्राने “फॅशन” ची एक वेगळी ओळख चित्रपट जगतास करून दिली आहे, सहावारी, नऊवारी हे त्याचेच उदाहरण !

“महाराष्ट्र फॅशन फाऊंडेशन” ही संस्था फॅशन शो च्या माध्यमातून रसिकांस महाराष्ट्र फॅशन चा एक पैलू उलगडून दाखविण्याचे काम करते. नविन पेहेराव व महाराष्ट्रीयन संस्कृती यांचा मिलाफ करून नविन फॅशन चा पायंडा घालण्याचे काम हि संस्था अविरत करत आहे.

“महाराष्ट्र फॅशन फाऊंडेशन” पुरस्कृत “”महाराष्ट्र फॅशन उत्सव २०१२” हा सोहळा नुकताच पार पडला, उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध ज्वेलरी डिजाईनर “निता भोसले” व अनेक मान्यवर उपस्थित होते.
वृन्दावन लॉन्स येथे रंगलेल्या या सोहळ्यात अनेक नविन मॉडेल्स नी आपल्या अदाकारिने प्रेक्षकांस मंत्रमुग्ध केले, तसेच सेलेब्रिटींचा परफॉर्मन्स सर्वांची दाद मिळवून गेला.

फॅशन क्षेत्राशी निगडीत डिजाईनर्स आणि मॉडेल्स यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेचे चेअरमन श्री.लक्ष्मीकांत गुंड यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केला व महाराष्ट्रातील फॅशन जागतीक स्थरावर नेण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आहेत.

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *