रायगड किल्ल्याचे फोटो

हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.
पुण्याहून रायगडला जाण्यासाठी दुपारी १.३० वाजता बस आहे. ती आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरूजापाशी घेऊन जाते. महाडहूनदेखील रायगडासाठी दिवसातून तीन वेळा बस आहे. खूबलढा बुरूजापासून पायर्‍या चढावयास सुरवात करून रमत-गमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो. ज्यांना चालण्याचे श्रम नको आहेत, अशांसाठी ” जोग कन्स्ट्रक्शन” ने रोपवे ची सोय केलेली आहे.
किल्ल्यावर मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बंगले आहेत. भोजनाची व्यवस्था देशमुखांचे उपाहार गृह आणि म.प.वि.मं. चे कॅंटीन येथे होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या खोल्यांपाशीच एका मोठ्या फलकावर गडाचे मानचित्र चितारलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन संपुर्ण गड फिरणे अवघड नाही. अथवा गो.नी.दाडेकरांचे “शिवतिर्थ रायगड” हे माहिती पुस्तक देशमुखांच्या उपहारगृहात उपलब्ध आहे. राजसभा, टकमक टोक, बाजारपेठ, जगदिश्वराचे मंदिर, महाराजांची समाधि, हिरकणी बुरूज अशा नामवंत ठिकाणांव्यतिरिक्त वाघ दरवाजा, भवानी टोक अशी ठिकाणेही बघण्यास विसरू नका.

[nggallery id=8]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *