श्री कसबा गणपती पुणे फोटो

श्री कसबा गणपती पुणे फोटो | Shri Kasba Ganpati Pune Photos
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. शाहाजी राजांनी(शहाजीराजे भोसले) पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना केली होती. जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने द्रूष्टांत दिल्याने जिजाबाईंना या गणपतीची स्थापना केली होती असे म्हट्ले जाते. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना या मुर्तीचे दर्शन घेऊन जात असत. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. पुण्याच्या महापौरंच्या हस्ते पालखीतल्या या गणपतीची पुजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. जेव्हा १८९३ लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरवात केली त्याच वर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली. ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर नेहामीच गर्दी करतात.

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *