तांबडी जोगेश्वरी गणपती पुणे फोटो

तांबडी जोगेश्वरी गणपती पुणे फोटो | Tambdi Jogeshwari Ganpati Pune Photos

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या मुर्तीचे वैशिष्टय म्हणजे दरवर्षी या मुर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी पुन्हा नव्याने स्थापना करण्यात येते.

तांबडी जोगेश्वरी हे पूण्याचे ग्राम दैवत आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वंयभू आहे.

शिस्तबध्द मिरवणुक हे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य समजलं जाते. घोड यूध्द आणि तलवारी च्या कसरतींचा मिरवणुकीत समावेश असतो. या मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळक यांच्या काळातील आहे. पण १९३० पासून मंडळाने मोठया प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करयाला सुरवात केली.

सुरवातील गणपतीची स्थापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जायची परंतु २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येते. गणेशाची मुर्ती शाडुची मातीपासून बनवण्यात येते. गणेश मुर्तीसाठी मंडळाने चांदीचा देव्हारा बनवला आहे.
[nggallery id=101]

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *