ठाणाळे लेणीचे फोटो

सुधागडच्या पायथ्याजवळ हा लेण्यांचा समुह आहे. पुण्याहून खोपोली-पाली-नाडसूर रस्त्याने ठाणाळे गावापर्यंत गाडीने जाता येते. येथून दोन तासाच्या पाय वाटेने ठाणाळे लेण्यांपर्यंत पोहोचता येते. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात यांची निर्मिती झाली असावी. ही एकूण २३ लेणी आहेत.

त्यात दोन चैत्य स्तूप आणि विहार आहेत. या लेण्यांबाबत विशेष ऐतिहासिक गोष्ट अशी की क्रांतिकारक वासुदेव बळबंत फडके यांनी या लेण्यांत अश्रय घेतला होता.

[nggallery id=21]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *