तिकोना किल्ल्याचे फोटो

येथे जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग पुण्याहून लोणावळ्याला जाताना कामशेत स्थानकापासून जवळच पुणे मुंबई रस्त्यावर पवना धरणाकडे (काळे कॉलनीकडे) जाणारा रस्ता फुटतो. या रस्त्याने काळे कॉलनी मार्गे तिकोना पेठ या गावाजवळ गेल्यास गावाच्या मागे एखाद्या पिरॅमिडसारखा दिसणारा तिकोना किल्ला नजरेसमोर येतो.

कामशेतहून २० कि.मी. अंतरावर तिकोना पेठ आहे. किल्ल्यावर गावातूनच वाट जाते. किल्ल्यावर प्राचीन मंदिर असून पाण्याचा भरपूर साठा आहे. मोठा तलाव व काही गुहा आहेत. माथ्यावरुन पश्चिमेकडील तीनही बाजूंनी पवना जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. गडावरून दिसणारे लोहगड – विसापूर – तुंग किल्ल्याचे दृश्य विलोभनीय आहे. पावसाळ्यात रानफुलांचे आणि फुलपाखरांचे ताटवे नयनरम्य असतात.

[nggallery id=6]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *